दुष्काळाचा कलंक पुसण्यास ‘सकाळ’चा हातभार - नागनाथ वाकुडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

जत - तालुक्‍यावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ‘सकाळ’ योगदान देत आहे. टॅंकरमुक्‍तीच्या चळवळीत सहभागी होऊन ‘सकाळ’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. लोकांनी यात सहभागी झाल्यास ही चळवळ अधिक व्यापक होईल, असे मत  उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी व्यक्त केले.

जत - तालुक्‍यावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ‘सकाळ’ योगदान देत आहे. टॅंकरमुक्‍तीच्या चळवळीत सहभागी होऊन ‘सकाळ’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. लोकांनी यात सहभागी झाल्यास ही चळवळ अधिक व्यापक होईल, असे मत  उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी व्यक्त केले.

सकाळ रिलिफ फंड आणि ‘सकाळ’च्या तनिष्का गटातर्फे गाळमुक्‍त बंधारा आणि गाळयुक्‍त शिवार’ मोहिमेची सुरवात अचकनहळ्ळी येथे झाली. त्यावेळी  ते बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ‘ॲग्रोवन’चे जाहिरात व्यवस्थापक शीतल मासाळ, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उपसरपंच प्रमोद सावंत तनिष्का सदस्या, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी ‘सकाळ’ आणि ‘तनिष्का’च्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. वाकुडे म्हणाले,‘‘जत तालुका कोणी पाहिला नसेल; मात्र जत म्हटले की नको  रे बाबा तिथे दुष्काळ आहे, अशी प्रतिक्रिया येते.  अधिकारी व नोकरदार येथे येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे दुष्काळाचा कलंक या तालुक्‍यावर बसला आहे. मात्र येथील माणसे अत्यंत कष्टाळू आहेत. ओसाड जमिनीतही ओलावा निर्माण करणारी आहेत. त्यांना योग्य दिशा दिल्यास त्यांची प्रगती होऊ शकते. हे काम ‘सकाळ’ करीत आहे. महिलांचा सहभाग असल्यास प्रगतीचे पावले वेगाने पडतात हे ओळखून तनिष्का माध्यमातून त्यांनी सामाजिक उपक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून गाळमुक्‍त मोहीम हाती घेतली आहे. गेली चार वर्षे हा सामाजिक उपक्रम ‘सकाळ’ राबवित आहे. निश्‍चितच दुष्काळाचा कंलक पुसण्याचेच काम ते करीत आहेत. याला लोकांचे बळ मिळाल्यास अधिक व्यापक चळवळ उभी राहील. 

सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी ‘तनिष्का’ व ‘सकाळ’च्या उपक्रमांची माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनीही ‘सकाळ’च्या कामांचे कौतुक केले. प्रास्ताविक व आभार उपसरपंच प्रमोद सावंत यांनी मानले. यावेळी संतोष पोरे, पुंडलिक शिंदे, तुकाराम केंगार, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब निकम  पाटील, जालिंदर शिंदे, दत्ता साळुंखे, धानम्मा कोरे, पार्वती कोरे, योगिता सावंत, राजश्री जाधव, मंगल गुरव, बायक्‍का पाटील, धोंडीबाई लोहार, लक्ष्मीबाई कोरे आदी उपस्थित होते.

Web Title: sakal contribution to erase the dilemma of drought