करमाळा- 'आदिनाथ'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संतोष जाधव-पाटील

अण्णा काळे
बुधवार, 14 जून 2017

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बागल गटाचे संतोष जाधव-पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

करमाळा- येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बागल गटाचे संतोष जाधव-पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

आज (ता. 14) कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातंधिकारी मारूती बोरकर यांनी काम पाहिले. यावेळी कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल, रमेश कांबळे, प्रकाश झिंजाडे, कल्याण गायकवाड, किरण कवडे, नितीन जगदाळे, शिवाजी पांढरे, पोपट सरडे, स्मीता पवार, अविनाश वळेकर, पांडुरंग जाधव, बापुराव देशमुख, मंदा गोडगे, भामाबाई केकाण,षहरीदास केवारे, नामदेव भोंगे उपस्थित होते.
 
या कारखान्याची निवडणूक बागल गट, पाटील गट, जगताप गट व शिंदे गट अशी चौरंगी झाली होती. यात राष्ट्रवादीच्या बागल गटाचे सर्व 21 संचालक विजयी झाले होते. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बॅकेच्या संचालिका रश्मी बागल रश्मी बागल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र आज संतोष जाधव-पाटील यांनी संधी देण्यात आली आहे.
 

Web Title: sakal news karmala news solapur news adinath sugar factory election NCP

टॅग्स