चला, सर्वांगीण आरोग्यासाठी सज्ज होऊ

चला, सर्वांगीण आरोग्यासाठी सज्ज होऊ

कोल्हापूर - अभ्यासात मन लागत नाही...वारंवार कंटाळा येतोय...वजन कमी करायचं आहे...रक्तदाब, मधुमेहाने त्रस्त झालाय...चला, तर मग निरामय, सर्वांगीण आरोग्यासाठी आता सज्ज  होऊया.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित महासूर्यनमस्कार आणि फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रमात सहभागी होऊया, असे आवाहन आता विविध तज्ज्ञांकडून होऊ लागले आहे. मेरी वेदर मैदानावर येत्या शनिवारी (ता. १६) महासूर्यनमस्कार तर रविवारी (ता. १७) फॅमिली फन रन व झुंबा डान्स उपक्रम होणार आहे.

सकाळ माध्यम समूहातर्फे वर्षभर आरोग्यदायी उपक्रम राबविले जाणार असून, त्याचाच हा उपक्रम एक भाग आहे. दोन दिवसांच्या या उपक्रमाला रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंटरचे विशेष सहकार्य 
मिळाले आहे. डॉ. प्रांजली धामणे यांच्याकडून निरोगी आरोग्याच्या टिप्स तर विशाल गुडूळकर यांच्याकडून धावायचे कसे, धावण्यापूर्वी व्यायाम काय करावा, त्याचे फायदे काय आहेत, हे शिकायला मिळणार आहे. फॅमिलीसोबत सर्वांनी दोन-तीन किलोमीटर धावायचे आहे. मैदानावर झुम्बा डान्स एन्जॉय करायचा असून पुण्यातील ‘विवर्त’च्या संस्थापिका ऋतुजा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होणार आहे. 

सूर्यनमस्कार हा प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार असून अनादिकाळापासून तो भारतात केला जातो. विशेषतः शालेय मुलांसाठी सूर्यनमस्कार अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी तर त्याशिवाय इतर सर्वांसाठीही निरामय आरोग्य देणारा हा व्यायाम प्रकार आहे. 
- दत्ता पाटील, प्रशिक्षक

धावणं (रनिंग) हा सर्वांत सोपा व सरळ उपाय आहे. यासाठी कोणत्याही फारशा साधनांची गरज नसल्याने, आपण 
कुठेही करू शकतो. रनिंगची सुरवात करताना त्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे व त्याप्रमाणे आपण धावलं पाहिजे. आपल्या रोजच्या धावण्याचे वेळापत्रक करायला हवे आणि ते अवलंबले पाहिजे. 
-विशाल गुडूळकर, अल्ट्रा रनर व पेसर, कोल्हापूर

झुम्बा हा एक व्यायाम प्रकार असून त्याला नृत्य व एरोबिक्‍सची जोड देऊन तयार केलेला फिटनेस वर्क आऊट आहे. झुम्बा आपल्या शरीराला संतुलित व लवचिक बनवते. तेच तेच व्यायाम करून जर कंटाळा आला असेल, तर बदल म्हणून झुम्बा करून पाहू शकता. नवीन प्रकारचा व्यायाम तुम्ही नक्कीच ट्राय करा.
- ऋतुजा इंगळे, संस्थापिका- विवर्त डान्स कंपनी, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com