शालार्थ प्रणाली "ऑफ'च 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सातारा - प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पगारासाठी शासनाने नोव्हेंबर 2012 पासून "शालार्थ' ही प्रणाली सुरू केली होती. गेल्या सात- आठ महिन्यांपासून ही प्रणाली बंद झाली आहे. त्यामुळे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार सध्या ऑफलाइन पद्धतीने दिला जात आहे. मात्र, ऑफलाइन पगार काढले जात असल्याने नेहमीप्रमाणे शिक्षकांचे पगार उशिरा होत आहेत. 

खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तसेच जिल्हा परिषद, महापालिका, पालिकेमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी "शालार्थ' ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचा उपयोग केल्यानंतर शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावेत, ही अपेक्षा शासनाची होती. त्यानुसार ही प्रणाली 2012 पासून सुरू झाली. "शालार्थ' प्रणाली सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होऊ लागले होते. मात्र, गेल्या सात- आठ महिन्यांपासून ही प्रणाली "ऑफ' झाली आहे. त्याचा परिणाम शिक्षकांच्या पगारावर होऊ लागला आहे. प्रत्येक महिन्याच्या जवळपास 15 तारखेनंतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार होऊ लागले आहेत. त्याचा त्रास शिक्षकांना होत आहे. 

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये 12 जानेवारी 2018 पासून तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. ती प्रणाली सुरू करता येत नाही. त्यामुळे जानेवारी 2018 पासून शिक्षकांचे पगार ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. सुरवातीला एप्रिल 2018 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने वेतन देण्यास सांगितले होते. मात्र, आता शासनाने नव्याने आदेश काढून ऑगस्ट ते मार्च 2019 पर्यंत सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Web Title: salartha system closed