शिवरायांच्या चित्राची 50 हजार रुपयांना विक्री

Sale of Shivaraya's painting for Rs. 50,000
Sale of Shivaraya's painting for Rs. 50,000

आरग : कोरोना काळातील वेळेचा सदुपयोग करून जगप्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार आदमअली मुजावर यांनी अनेक महामानवांची पेंटिंगे व्यंगचित्रे रेखाटली आहेत. या पेंटिंग चे प्रदर्शन त्यांनी घरीच सुरू केले आहे. त्यातील छत्रपती शिवरायांच्या चित्राची 50 हजार रुपयांना विक्री झाली असून येणारी रक्कम ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. 

लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असल्याने घरीच बसून त्यांना समाजासाठी काहीतरी करावेसे वाटत होते. पेंटिंगच्या विक्रीतून निधी संकलनाचा निर्णय घेतला. कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालय ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. वीस वेळा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, गौतम बुद्ध आदी व्यक्तिचित्रे रेखाटली असून घरीच प्रदर्शन सुरू केले आहे.

पेंटिंगच्या विक्रीतून खर्च वजा जाता राहिलेली सर्व रक्कम कोरोना मुख्यमंत्री सहायता निधी साठी देण्याचा संकल्प आहे. सी. आर. सांगलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंटिंग 50 हजार रुपयांना विकत घेतले. आरगेतील अमर पाटील , पेठ वडगावचे शिक्षक प्रदीप येवले ,ग्रामसेवक संदीप साळुंखे , शिक्षिका स्मिता माळी, उपशिक्षणाधिकारी मारुती लिगडे , सिद्धेवाडीचे सरपंच दादा वाघमोडे , मिरजेचे प्रसिद्ध डॉ. परमशेट्टी अश्‍या अनेक व्यक्तीनी स्वागत मूल्य देऊन पेंटिंग खरेदी केले आहे. 

माजी मंत्री अजितराव घोरपडे, डी. एन. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे , माजी शिक्षणाधिकारी महेश चोथे , विस्ताराधिकारी प्रदीप चव्हाण , कोल्हापूरचे वित्त अधिकारी राहुल कदम , अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील आदी कलाप्रेमीनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

सर्व पेंटिंगसाठी ऑइल कलर व कॅनव्हासवरचा वापर करण्यात आला आहे. तैल रंगातील चित्रे शंभर ते दीडशे वर्ष टिकतात. पेंटींग खरेदी करून कोरोना निधीसाठी सहाय्य करावे असे आवाहन आदमाली मुजावर यांनी केले आहे. 
- आदमाली मुजावर ( रांगोळीकार )

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com