भ्रष्टाचारविरोधी लढाई सुरूच राहणार : समरजितसिंह घाटगे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

कागल : नगराध्यक्षपदी आमचाच उमेदवार जिंकेल, याची आम्हाला खात्री होती. पण तसे होऊ शकले नाही. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो. अन्याय व भ्रष्टाचारविरोधी लढा आम्हाला कायम ठेवावा लागणार आहे. हा लढा प्रदीर्घ असणार आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार मानतो. त्यांच्या पाठीशी भाजप आणि मी स्वत: कायमपणे राहणार असल्याची प्रतिक्रिया समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ''सत्ता असो-नसो, काम कधी थांबत नसते. आश्‍वासनाप्रमाणे पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पोलिस ठाणे सुरू करण्यात येईल. त्याद्वारे तेथे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून विकासकामे करू. आमदार हसन मुश्रीफ यांनी आम्हाला चांगला अनुभव दिला. त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. कागल पालिकेत आमची चांगल्या कामाला साथ असणार आहे. पण भ्रष्टाचाराला विरोधच राहील. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगला लढा दिला. या लढ्यात भाजपची मोठी साथ मिळाली. त्यातून 46 टक्के लोक आमच्या सोबत आहेत, ही जमेची बाजू आहे.'' 

चुका सुधारून कारभार करू : हसन मुश्रीफ 
सुरवातीपासून धक्‍क्‍यावर धक्के बसत गेले. मात्र माझ्या पाठीशी गहिनीनाथ, श्रीराम व गोरगरीब जनता खंबीरपणे उभी असल्याने विजय मिळाला. अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ''ही निवडणूक ऐतिहासिक झाली. माझ्या विरोधात जिल्ह्यातील मोठ्या शक्ती कार्यरत होत्या. त्यामुळे मला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. सुरवातीलाच ए.बी. फॉर्मचा घोळ झाला. मात्र आम्ही व सेनेने दिलेला शब्द पाळला. चंद्रकात गवळी यांचा गट सत्तेपासून दूर होता. ते सत्तेत यावे, असे वाटत होते. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्यामुळे आमची सत्ता आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चांगले काम करू.आम्हाला सोडून गेलेल्यांची गय केली जाणार नाही. विजय तो विजयच असतो. तो नेहमी सत्याचा होतो. झालेल्या चुका सुधारू. मतदान टक्केवारीचे आत्मपरीक्षण करू.'' 

या वेळी नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार माणिक माळी, प्रताप ऊर्फ भैया माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Samarjit Singh Ghatge speaks after defeat in Kagal