संभाजी भिडेंची आज सोलापुरात सभा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा बुधवारी (ता. 9) सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार आहे. 

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा बुधवारी (ता. 9) सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार आहे. 

दुर्गराज किल्ले रायगडावर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी संभाजी भिडे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गराज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी बसविण्यात आलेले 32 मणाचे सुवर्ण सिंहासन पुन्हा बसविण्याचा संकल्प देशभरातील तमाम शिवभक्तांनी 4 जून 2017 रोजी किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या संकल्प सोहळ्यात केला आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत संभाजी भिडे मार्गदर्शन करणार आहेत. 

दरम्यान, भिडे यांच्या सभेला परवानगी देवू नये अशी मागणी काही संघटनांनी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे केली होती. मंगळवारी रात्री उशीरा सभेला परवानगी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी सभेसाठी आयोजकांना काही अटी घालून दिल्या आहेत. 
- कमलाकर पाटील, 
पोलिस निरीक्षक

Web Title: sambhaji bhide s rally at solapur today