भिडे यांच्या भाषणाची मोडतोड; नितीन चौगुलेंचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जातीयवाद्यांकडून 'शिवप्रतिष्ठान'ची बदनामी

सांगली: "शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी नाशिक येथे केलेल्या भाषणाची मोडतोड करून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे. यामागे जातीयवादी संघटनांचा हात असल्याचा आरोप प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले, अविनाश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. संभाजीराव ब्रह्मचारी असून, त्यांच्या नावावर एकही मालमत्ता नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

श्री. चौगुले म्हणाले, की संभाजीराव भिडे यांची बदनामी करण्याचा उद्योग दोन वर्षांपासून सुरू आहे. असे प्रयत्न जातीयवादी संघटनांनी अनेकदा केले. त्यात भीमा-कोरेगावच्या दंगलीतही गोवण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यात भिडेंचा कोणताही संबंध नसल्याने त्यांच्या बदनामीसाठी पुन्हा उद्योग सुरू झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भाषणात त्यांनी त्यांच्याशी संबंधित मांजर्डेच्या मोहनराव शिवाजीराव मोहिते यांनी आयुर्वेदिक आंब्याविषयी जे त्यांना सांगितले ते कथन केले. आंब्याबाबतचा जो दावा होता, तो मोहिते यांनी केल्याचे त्यांनी सांगितले होते. हे उदाहरण देत आंबा खाल्ल्याने असे होत असेल तर महापुरुषांच्या देशभक्तीचे ज्ञानामृत सर्वांना दिले तर किती देशभक्त घडतील, असे त्यांना म्हणायचे होते. परंतु, त्या भाषणाच्या आधीचे व नंतरचे वाक्‍य काढून दाखविण्यात आले.

Web Title: sambhaji Bhides speech breaks down says nitin chaugule