Maratha Reservation : 'सर्वोच्च न्यायालयातही सर्वोत्तम वकिलांची फौज द्या'

Maratha Reservation : 'सर्वोच्च न्यायालयातही सर्वोत्तम वकिलांची फौज द्या'

कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम वकिलांची फौज पाचारण करा, अशी मागणी यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी आतापासूनच गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वोत्तम वकिलांची फौज पाचारण करा. 

-   खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई उच्च न्यायालयातील अनुभव पाहता सर्वोच्च न्यायालयातही चांगले वकील दिले जातील, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. या आंदोलना दरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची विनंतीही यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. 

महत्वपूर्ण लढा आपण जिंकलाच आहे, मराठा समाजाच्या सर्व मागण्याविषयी सरकार गंभीर आहे. दिल्लीतसुद्धा कुठेही कमतरता भासू देणार नाही,

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com