जमिनीच्या वादातून संभाजी ताके यांचा खून

सुनील गर्जे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नेवासे : तालुक्‍यातील जेऊर हैबती येथे जमिनीच्या वादातून वकिलासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नेवासे पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले आहे.

नेवासे : तालुक्‍यातील जेऊर हैबती येथे जमिनीच्या वादातून वकिलासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नेवासे पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले आहे.

जेऊर हैबती येथील शिवाजी राजाराम ताके व ऍड. संभाजी राजाराम ताके या दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीचा वाद होता. याबाबतचे प्रकरण नेवासे येथे न्यायप्रविष्ट होते. याच रागातून शिवाजी ताके यांचा मुलगा शरद (वय 36) याने काही लोकांना सोबत घेऊन ताके यांच्या राहत्या वस्तीवर ऍड. संभाजी ताके यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. ऍड. ताके यांच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने घाव घातल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ताके यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे संतोष सुंदरराव घुणे (वय 36, रा. बहीरवाडी, ता. नेवासे) यांच्यावरही कुऱ्हाडीचे वार झाल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याचे समजले. या वेळी आणखीही काही व्यक्तींवर हल्ला झाला. त्यात जबर जखमी झाल्याने त्यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऍड. ताके नगर येथील जिल्हा न्यायालयात गेल्या 30 वर्षांपासून वकिली करत असून, बार असोसिएशनचे माजी अध्यक्षही आहेत.

घटनेची माहिती कळताच नेवासे ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, कुकाणे औटपोस्टचे सहायक फौजदार संतोष फलके यांनी फौजफाट्यासह त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी शरद शिवाजी ताके याला ताब्यात घेतले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhake Takay murdered by land dispute