वेश बदलून महिला तहसिलदाराने पकडले वाळू माफिया 

सनी सोनावळे
शनिवार, 19 मे 2018

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) - येथे मुळा नदीपात्रातील बेकायदा वाळुउपसा करत असताना छापा घालुन एक जेसीबी व एक ट्रॅक्टर तहसिलदार भारती सागरे यांच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई सागरे यांनी दुचाकीवर वेष बदलुन केल्याने परीसरात याचीच आज चर्चा होती.
 या नदीपात्रातुन जेसीबी मशिनच्या साहाय्याने होत असलेल्या वाळुउपशाची माहीती सागरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेली वाहने पारनेर येथे तहसिल कार्यालयात नेण्यात आली. या वाहंनावर दंडात्माक कारवाई करण्यात येणार आहे. तर अनेक वाहनांना या कारवाईची माहीती कळताच इतर वाळुउपसा करणाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याने या कारवाईत ते सापडले नाही. 

याबाबत माहीती देताना सागरे म्हणाल्या, इतर वेळी आम्ही शासकीय गाडीने जात असल्याने त्याची माहीती तात्काळ वाळुउपशा करणाऱ्यांना मिळत असे. यावेळी दुचाकीवर जाऊन ही कारवाई केल्याने जेसीबी व ट्रॅक्टर हाती लागला. ट्रॅक्टरवर 1 लाख रूपये व जेसीबी वर 7 लाख रूपये अंदाजे दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

या पथकात टाकळी ढोकेश्वरचे मंडलधिकारी शरद झावरे, तलाठी अशोक लांडे, आकाश जोशी, दिपक गोरे, बी.वाय निंबाळकर होते.

Web Title: Sand Mafia caught by woman Tahsildar bharti sagre

टॅग्स