'वाळू तस्करांना मोका लावणार '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

सांगली - वाळू तस्करांची दादागिरी आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाळू तस्करांचे हल्ले ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. वाळू तस्करांची गय केली जाणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टाला हात लावला तर सहन करणार नाही. महिन्याभरात जिल्ह्यातील 25 ते 30 वाळू तस्करांना मोका लावणार, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला. 

सांगली - वाळू तस्करांची दादागिरी आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाळू तस्करांचे हल्ले ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. वाळू तस्करांची गय केली जाणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टाला हात लावला तर सहन करणार नाही. महिन्याभरात जिल्ह्यातील 25 ते 30 वाळू तस्करांना मोका लावणार, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला. 

कडेगाव तालुक्‍यातील वांगी परिसरात वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न झाला. याची गंभीर दखल घेत श्री. पाटील यांनी तातडीने बैठक घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना ते म्हणाले,"" वाळू तस्करांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. वाळू तस्करांची दादागिरी मोडीत काढण्यासाठी व अशा घटना रोखण्यासाठी महसूल आणि पोलिस यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांची समन्वय समिती स्थापन करावी. येत्या 9 जानेवारीला तहसीलदार, पोलिस स्थानकप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यांची सविस्तर बैठक घेऊन पुढील दिशा निश्‍चित करण्यात येईल.'' 

ते म्हणाले, ""कोल्हापुरात राजकारण्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या वाळू तस्करांवरही कारवाई केली आहे. सांगलीतही अशी कारवाई करण्यात येईल. येत्या महिनाभरात गुन्ह्यांच्या आधारावर वाळू तस्करांवर मोका लावणार आहे. त्यांची दादागिरी कोणत्याही परिस्थितीत मोडून काढण्यात येईल.'' 

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, ""जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कडेगाव उपविभागीय अधिकारी प्रवीण साळुंखे, जत उपविभागीय अधिकारी अशोक पाटील, कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे, कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे, जत तहसीलदार अभिजित पाटील, मिरज तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.'' 

मायक्रोफायनान्स कंपन्यांची दखल घेऊ 
मायक्रोफायनान्स कंपन्या आरबीआयच्या नियमात काम करत असल्याचा दावा कंपन्यांकडून करण्यात येत आहे. त्यांच्याबद्दल तक्रारी येत आहेत. महिला कर्जदारांची होत असलेल्या पिळवणुकीबाबत गंभीर तक्रारी आल्या तर दखल घेऊ. त्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे श्री. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

Web Title: sand mafia in sangli