सांगली : चांदोली जंगल सफारीने फुलली

सुटीची संधी, पर्यटकांची गर्दी; वाहन, गाईडमुळे जंगल दर्शन सुलभ
चांदोली जंगल सफारीने फुलली
चांदोली जंगल सफारीने फुललीsakal

सांगली : निसर्ग वैभवाने संपन्न असलेल्या सह्याद्री रांगांतील चांदोलीच्या जंगल सफारीला झुंबड उडू लागली आहे. १५ ऑक्टोबरपासून जंगल खुले झाले असून, पहिल्या शनिवार, रविवारी मोठ्यासंख्येने पर्यटकांनी भेट दिली. वाहन, गाईडची सोय असल्याने सफारी आनंददायी आणि सुरक्षित होत आहे. पहाटे लवकर आल्यास गवे, सांबर, भेकर यांचे दर्शन होत आहे. दिवाळीच्या सुटीत संख्या वाढण्याची अपेक्षा वन विभागाने व्यक्त केली आहे.

चांदोली ही जिल्ह्याची प्रमुख संपत्ती आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे तेच मोठे केंद्र आहे. येथे पर्यटकांनी अधिकाधिक आकर्षित व्हावे, यासाठीच्या योजना आखल्या जात आहेत. सध्या येथे प्रचंड वनसंपदा, प्राणी, पक्षी, गुढे पाचगणीचे लगतचे पठार, झोळंबीचा फुलांचा सडा, काही प्राचीन मंदिरे, वारणा नदीवरील धरण अशी मोठी मेजवानीच आहे. जनीचा आंबा, विठलाई मंदिर, झोळंबी, शेवताई मंदिर, पाण्याचा लपणगृह, धनगरवाड्याची वेगळी जीवनशैली अनुभवता येते.

चांदोली जंगल सफारीने फुलली
जेल की बेल? आर्यन खान 17 दिवसांपासून अटकेत; आज सुनावणी

येथे सध्या १६ जिप्सी गाड्यांची सोय आहे. १५ ते १६ गाईड आहेत. लवकरच आणखी काही तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून, गाईडची संख्या वाढवली जाणार आहे. येथे वारणावतीत जेवणाची उत्तम सोय आहे. काही हॉटेल सुरू झाली आहेत, घरगुती स्वरूपातही जेवण बनवून दिले जाते.

हे महत्त्वाचे

सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत पासची सोय

गुरुवारी जंगलात प्रवेश बंद

वाहन शुल्क- १२०० रुपये

एका वाहनात- ७ लोकांची सोय

माणशी शुल्क- मोठ्यांना ३०, लहानांना १५ रुपये

वाहन प्रवेश शुल्क- १०० रुपये

मोठा कॅमेरा शुल्क- ५० रुपये

जंगल प्रवेश सुरू झाल्यापासून दररोज लोक येत आहेत. शनिवारी, रविवारी चांगली गर्दी होती. दिवाळीच्या सुटीत मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. पर्यटन वाढत जाईल, तशा अधिकाधिक सुविधा दिल्या जात आहेत.

- हारुण गार्दी, फॉरेस्ट रेंज ऑफिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com