Sangali : सांगलीच्‍या विकासासाठी ९४ कोटी,आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली फडणविसांची भेट

आमदार सुधीर गाडगीळ : दोन मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार
 अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस sakal

सांगली : शहरासह सांगली विधानसभा मतदार संघातील रस्ते, आयर्विन पुलाचे मजबुतीकरण व समांतर पुलाच्या सुशोभिकरणासाठी, रस्ते रुंदीकरण करण्यासाठी तब्बल ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. शहरातील प्रशिक चौक ते हरिपूर व कर्नाळ पोलिस चौकी ते शिवशंभो चौक हे दोन मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार गाडगीळ म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटींच्या निधीसह विधानसभा मतदार संघातील रस्ते, विविध विकासकामांसाठी तब्बल ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

प्रशिक चौक ते हरिपूरपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी १२ कोटी, शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलिस चौकीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी ७ कोटी, पुष्पराज चौक ते विश्रामबाग रस्त्यासाठी १३ कोटी, वारणाली रेल्वे ओव्हर ब्रीज ते कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर रस्त्यासाठी ४ कोटी, स्फूर्ती चौक ते सांगली-मिरज मार्गावरील आलदर चौकापर्यंत रस्त्यासाठी ५ कोटी,

सांगलीवाडी टोल नाका ते शिवशंभो चौक रस्त्यांसाठी २ कोटी, नावरसवाडी ते कर्नाळ रस्त्यासाठी ५ कोटी, मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्ता करण्यासाठी ३ कोटी, हसरा चौक ते इनाम धामणी चौक १०० फुटी रस्त्यांसाठी ४ कोटी, शिरगाव फाटा खोतवाडी ते नांद्रे रस्त्यासाठी ३ कोटी, माधवनगर रोडवरील संपत चौक ते अहिल्यानगर आंबा चौक रस्त्यासाठी ६ कोटी, कर्नाळ ते बिसूर रस्त्यासाठी ४ कोटी,

 अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस
Kolhapur News : कसबा बावड्यातील दोघांकडून सोलापुरातील महिलेला गंडा

कर्नाळ रोड मसोबा मंदिर एम. आय. टी. स्कूल ते मौजे डिग्रज गाव रस्त्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आयर्विन पुलाची दुरुस्ती व समांतर पुलाच्या सुशोभीकरणासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सांगली विधानसभेसाठी ११८ कोटी निधी आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नांनी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना आमदार सुधीर गाडगीळ. यावेळी उपस्थित माजी आमदार अमल महाडिक.

 अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस
Sangli : हॉटेलमध्ये धुडगूस; अकरा अटकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com