सांगली : ई-चलन भरा अन्यथा न्यायालयात खटला; वाहन धारकांना इशारा

वाळवा तालुक्यातील १९ हजार वाहन धारकांना इशारा; ५५ लाख थकबाकी
Traffic Police
Traffic PoliceCanva

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या साधारण १९ हजार वाहन धारकांवर दंड न भरल्यास वाहतुकीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल होण्याचे संकेत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांनी ई चलनाद्वारे झालेला सुमारे ५४.४३ लाखांचा दंड न भरल्यास पोलिस त्यांना न्यायालयात खेचणार आहेत. तत्पूर्वी, १० डिसेंबरपर्यंत दंड न भरल्यास लोक अदालतमध्ये त्यावर निर्णय होणार आहे. अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना आता कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

प्रत्येक सवयीला शिस्त लागावी, आळा बसावा म्हणून शासनाने वाहन धारकांना वाहतुकीचे अनेक नियम घालून दिले आहेत. तरीसुद्धा काही नागरिक वाहतुकीचे नियम मोडून त्याचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे अशा वाहन चालकांना ई-चलनाद्वारे दंड होतो. याचा संदेश वाहनधारकच्या मोबाईलवर येतो. परंतु बरेच जणांचे मोबाईल बंद असतात. त्यामुळे त्यांना याबाबत काहीच माहिती नसते. कोणत्या कारणासाठी दंड झाला आहे? आपणाला तो भरावा लागणार आहे, याची माहिती कल्पनाही नसते. आता १० डिसेंबरच्या आत वाहनधारकांना दंड भरण्याची मुदत दिली आहे. न भरल्यास त्यानंतर न्यायालयाला सामोरे जावे लागणार आहे.

Traffic Police
चाकूच्या धाकाने गोंदवल्यात लूट; रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

वाळवा तालुका

कालावधी - १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१

वाहनधारक - २३, ३१२

ई-चलनद्वारे दंड - ७१,३१, ८०० रु.

एकूण दंड वसूल- १६,८८,२००

रोख वसूल रक्कम - ९,३६, ८०० रु.

वाहन चालक- २,५८८

कार्डद्वारे वसूल रक्कम- ७,५१,४००

वाहन चालक- १,४१४

शिल्लक दंड रक्कम - ५४,४३,६००

वाहतूक नियमावलीचे उल्लंघन केलेल्या वाहन धारकांनी आपणांस केलेला ई-चलनाद्वारे केलेला दंड भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे लोक दंड भरत आहेत. अजूनही १९ हजार वाहनधारकांकडून सुमारे ५५ लाख रुपये येणे बाकी आहे.

- अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, इस्लामपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com