Sangali: नवमतदार नोंदणीसाठी १० हजार अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार नोंदणी

सांगली : नवमतदार नोंदणीसाठी १० हजार अर्ज दाखल

सांगली : सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमधील सर्व पात्र (१८ वर्षे पूर्ण) लोकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याबाबतची १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली मोहीम मंगळवारी (ता. ३०) संपणार आहे. गुरुवार (ता. २५)अखेर नवमतदारांचे १० हजार अर्ज दाखल झाले. विशेष मोहिमेंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर नोंदणी अधिकारी आज नवमतदारांची नोंदणी करून घेतील.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोंदणीला महत्त्व आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान आयोजित केली आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमधील सर्व पात्र (१८ वर्षे पूर्ण) लोकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असल्याबाबत खात्री करावी, तसेच नवमतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

हेही वाचा: नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याबाबत www.ceo.maharashtra.gov.inwww.nvsp.in वर खात्री करावी. ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत, तसेच २७ व २८ नोव्हेंबर या विशेष मोहिमेदिवशी नजीकच्या मतदार केंद्र, मतदार मदत केंद्र, निवडणूक शाखा, तहसील कार्यालयात मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना नं. ६ चा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जमा करावयाचा आहे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी www.nvsp.in वर ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे मतदार नाव नोंदवू शकतात. मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती करणे, मतदार यादीतून नाव कमी करणे व एकाच मतदारसंघामधील पत्त्यात बदल करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विधानसभानिहाय मतदार

मिरज- ३.१८ लाख

सांगली- ३.२० लाख

इस्लामपूर- २.७२ लाख

शिराळा- २.९५ लाख

पलूस-कडेगाव- २.८३ लाख

खानापूर- ३.२८ लाख

तासगाव-कवठेमहांकाळ- २.९९ लाख

जत- २.७४ लाख

एकूण- २३.९२ लाख

हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

मतदार नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी दिला आहे. आजअखेर १० हजार नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले. शनिवारी-रविवारच्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी. ऑफलाईन तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.

- एम. बी. बोरकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सांगली

Web Title: Sangali New Voter Registration Ten Thousand Application

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanglivoter list