महापौर-उपमहापौरपदांसाठी संगीता खोत, धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

सभागृह नेतेपदी भाजपने युवराज बावडेकर यांची निवड केली आहे. भाजपतर्फे पहिली संधी कोणाला याबाबत कुतूहल होते. महिला ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ जणी इच्छुक होत्या. त्यात मदने, खोत यांच्यासह अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर यांच्या नावाची चर्चा होती.

सांगली : भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड होणार आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कोअर समितीशी केलेल्या चर्चेनंतर या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

आज आज भाजपच्यावतीने सविता मदने यांनी तसेच पांडुरंग कोरे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून वर्षा निंबाळकर यांनी महापौरपदासाठी तर स्वाती पारधी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

सभागृह नेतेपदी भाजपने युवराज बावडेकर यांची निवड केली आहे. भाजपतर्फे पहिली संधी कोणाला याबाबत कुतूहल होते. महिला ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ जणी इच्छुक होत्या. त्यात मदने, खोत यांच्यासह अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर यांच्या नावाची चर्चा होती. स्थानिक भाजप नेत्याच्या कोअर समितीमध्ये याबाबत चर्चा झाली होती. या समितीने अंतिम निर्णय पालकमंत्र्यांकडे सोपवला होता. काल आमराई क्‍लबमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा होऊन आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. आज चौघांनी अर्ज दाखल केले असले तरी खोत आणि सूर्यवंशी यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. दरम्यान भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी तसेच माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांची निवड झाली आहे. 
 

Web Title: Sangeeta Khot and Dheeraj Suryavanshis name confirmed for the Mayor and Deputy Mayor posts