बीएसएनएलच्या देशव्यापी संपात सांगलीचे 575 कर्मचारी सहभागी 

बीएसएनएलच्या देशव्यापी संपात सांगलीचे 575 कर्मचारी सहभागी 

सांगली - बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. सांगलीत स्टेशन चौकातील मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. संपामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे कामकाज थंडावले आहे. 
जिल्हाभरात 575 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला. 

बुधवारपर्यंत संप चालणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त कृती समितीने दूरसंचार मंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा करुनही मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने संपाची हाक देण्यात आली आहे.

मागण्या अशा - 

  • बीएसएनएलला 4 जी सेवा सुरु करण्यासाठी योग्य ती साधनसामग्री पुरवावी जेणेकरुन जीओसह सर्व कंपन्यांशी स्पर्धा करणे शक्‍य होईल.
  • बीएसएनएलला डावलून अन्य खासगी कंपन्यांना झुकते माप दिले जात आहे; त्यामुळे विस्तारावर बंधने येत आहेत.
  • स्पर्धेत कंपनी मागे पडत आहे. कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे; याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे. कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग आजतागायत गठीत झालेला नाही; त्यामुळे नाराजीची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कंपनीला बॅंकांकडून भरीव अर्थसहाय्य मिळण्यासाठी सरकारने हमीपत्र द्यायला हवे.

आंदोलनात एन. व्ही. बोडस, सी. जी. जगताप, एच. डी. मोहीते, आर. ए. जमगी, हरीशभाई मोगताली, ए. ए. पटेल, एम. आर. पाटील, ए. डी. कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, व्ही. डी. भेदे, ए. ए. पटेल, अस्लम आरकाटे, मिलींद पळसुले आदींनी भाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com