Sangli Crime : आष्ट्यातील सूरज घस्ते टोळी हद्दपार; पोलिस अधीक्षकांचा दणका, सहा जणांना सांगलीसह दोन जिल्ह्यांतून कारवाई
Externment Action Against Suraj Ghaste Gang in Sangli : आष्टा पोलिसांनी सराईत सूरज घस्ते टोळीवर कठोर कारवाई करत सहा जणांना दोन वर्षांसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली.
सांगली : आष्टा पोलिस ठाणे हद्दीतील सराईत सूरज घस्ते (Suraj Ghaste Gang) टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले. या टोळीतील सहा जणांवर दोन वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली.