
Sangli Atpadi Rain
esakal
Sangli Weather Update : पावसाने आटपाडी तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. आज दुपारपर्यंत पावसाने शंभर मिलिमीटरवरचा टप्पा ओलांडला होता. पावसामुळे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जवळपास पंधरावर पूल पाण्याखाली गेल्याने या गावचा संपर्क तुटला होता. शेतीपिकांचे अगणित नुकसान झाले. आटपाडी तालुक्यात २१ व्या शतकातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पाऊस सुरूच होता. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.