सांगलीला महापूराचा धोका टळला 

विष्णू मोहिते
Wednesday, 19 August 2020

सांगली ः चांदोली, कोयना धरण पाणलोटात कालपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दोन्ही धरणातून बुधवारी विसर्ग कमी केल्यामुळे नद्यांची पाणी पातळी घटू लागली आहे. यामुळे सध्यातरी महापूराचा धोका टळला आहे.

सांगली ः चांदोली, कोयना धरण पाणलोटात कालपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दोन्ही धरणातून बुधवारी विसर्ग कमी केल्यामुळे नद्यांची पाणी पातळी घटू लागली आहे. यामुळे सध्यातरी महापूराचा धोका टळला आहे.

सांगलीत आयर्विन पुलावर मंगळवारी रात्री 39.1 फुटावरील पाणी पातळी बुधवारी सकाळी 38.8 फुटापर्यंत घसरली आहे. कोयना धरणापासून दोन ते अडिच फुट पाणीपातळी घट आली आहे. कोयना धरणातून 56 हजार क्‍येसेक्‍सचा विसर्ग सकाळी 11 पासून 31 हजार क्‍युसेक्‍सवर आणि चांदोली धरणातून 12 हजार वरुन 9 हजार 112 क्‍युसेक्‍सवर विसर्ग कमी केला आहे. 

सोमवारपासून सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातही आज तिसऱ्या दिवशी पावसाचीही उघडीप दिली आहे. दोन्ही नद्यांच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्यामुळे विसर्ग कमी केला आहे. सांगलीत आयर्विन पुलावर 39.1 फुटावर पाणीपातळी स्थिर होती. बुधवारी पहाटेपासून पाणीपातळीत घट होत आहे. अलमट्टी धरणातून 2.51 लाख क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. म्हैसाळ, टेंभू योजनेतून पाण्याची उचल सुरु आहे. पाणी पातळी घटल्याने कृष्णा-वारणा नदीकाठावरील लोकांना दिलासा मिळाला आहे. 

गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोटात 80 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. नवजाला 89 व महाबळेश्‍वर येथे 105 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. चांदोली धरण परिसरात 50 मिलिमिटर पाऊस पडला. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची मंगळवारी सायंकाळी सहा व बुधवारी सकाळी 11 वाजताची पाणी पातळी अशी ः कृष्णा पूल कराड 27.6 व 25.11, बहे पुल-13.7 व 11.10, ताकारी-45.9 व 43, भिलवडी पूल -45.2 व 42.9, आयर्विन पूल सांगली 39.1 व 38.8, अंकली पूल-42.6 व 42.8 आणि राजापूर बंधारा-46.9 व 48.11. 

 

क्षमता, पाणीसाठा-टीएमसी व आवक-विसर्ग -क्‍येसेक्‍समध्ये 

धरण, क्षमता, पाणीसाठा, आवक, विसर्ग. 
कोयना, 105.15, 91.43, 44,736, 31 हजार 
चांदोली, 34.40, 31.63, 12,517, 9112 
आलमट्टी, 123, 98.46, 2.59 लाख, 2.51 लाख 
... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli avoided the danger of floods