Bazar Samiti Result : 'मविआ'चा भाजपला मोठा दणका; 'या' तीन गावांत जबरदस्त जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) महेश पवार तर रामचंद्र पाटील व रावसाहेब पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे उमेदवार होते.
Sangli Bazar Samiti Election Result
Sangli Bazar Samiti Election Resultesakal
Summary

ढालगांव भागातील लंगरपेठचे महेश पवार, इरळीचे रामचंद्र पाटील व चोरोचीचे रावसाहेब पाटील हे तीन उमेदवार महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनेलमधून निवडणूक रिंगणात उतरले होते.

ढालगांव (सांगली) : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Sangli Bazar Samiti Election Result) लंगरपेठ, इरळी व चोरोची गावातील तीनही उमेदवार निवडून आल्यानंतर गावात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ढालगांव भागातील लंगरपेठचे महेश पवार, इरळीचे रामचंद्र पाटील व चोरोचीचे रावसाहेब पाटील हे तीन उमेदवार महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनेलमधून निवडणूक रिंगणात उतरले होते.

Sangli Bazar Samiti Election Result
Bazar Samiti Result : पंढरपूर बाजार समितीवर भाजपच्या माजी आमदाराचं वर्चस्व; 18 उमेदवार विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) महेश पवार तर रामचंद्र पाटील व रावसाहेब पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे उमेदवार होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज (शनिवार) दुपारी कळल्यानंतर लंगरपेठ गावातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.

Sangli Bazar Samiti Election Result
Bazar Samiti Result : सांगलीत 'मविआ'कडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; मंत्री, खासदार मैदानात उतरुनही झाला पराभव

ज्ञानू कांबळे, विजय शिंदे, अनिल सूर्यवंशी, प्रमोद सूर्यवंशी, यशवंत शिंदे, दादासाहेब घोरपडे, दत्तात्रय सूर्यवंशी, संदीप शिंदे, दादासाहेब सूर्यवंशी, शरद घुले, गुलाब मुलाणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. इरळी इथं राजेश पाटील, लक्ष्मण पाटील, दिलिप पाटील, नामदेव खांडेकर, तानाजी माने, गौतम लांडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तर, चोरोचीत बाळासाहेब पाटील, महादेव यमगर, संजय लवटे, संदीप यमगर, जगन्नाथ खताळ,बबन यमगर, काकासाहेब पोरे, विश्वनाथ यमगर,दत्तु यमगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com