Bazar Samiti Result : सांगलीत 'मविआ'कडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; मंत्री, खासदार मैदानात उतरुनही झाला पराभव

बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
Sangli Bazar Samiti Result
Sangli Bazar Samiti Resultesakal
Summary

बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे, तर एका जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

Sangli Bazar Samiti Result : सांगलीत भाजपला (BJP) जबर धक्का बसला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Sangli Bazar Committee Election) महाविकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. या निवडणुकीत भाजपच्या गटास फक्त एक जागा मिळाली आहे. निवडणुकीत भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil), माजी आमदार विलासराव जगताप यांनी मविआच्या नेत्यांपुढं मोठं आव्हान उभं केलं होतं.

Sangli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : 'या' तीन आमदारांनी करुन दाखवलं! जावळी-महाबळेश्वरात 'मविआ'चा केला सुपडासाफ

मात्र, याचा फायदा भाजपला होऊ शकला नाही. मतदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे यांचं नेतृत्व स्वीकारात महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला.

Sangli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : पंढरपूर बाजार समितीवर भाजपच्या माजी आमदाराचं वर्चस्व; 18 उमेदवार विजयी

बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे, तर एका जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com