
सांगली: गेली पाच दिवस गणरायाची भक्तिभावाने आराधना केली. सुख, शांती, वैभव आणि सर्वांना सदृढ आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी डोकं ठेवत मागणं मागत निरोप देण्यात आला. आज पाचव्या दिवशीच्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात साडेतीनशे मंडळांतील गणरायाच्या रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. दरम्यान, संस्थानच्या गणेश विसर्जनानंतर पावसाच्या सरी झेलत घरगुती गणरायालाही निरोप देण्यात आला. ‘पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’चा गजर करण्यात आला.