सांगली : तालुक्यात भाजपला गती मिळणार?

विक्रमसिंह सावंत-विलासराव जगताप आमने-सामने
sangli
sangliesakal

जत : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने ग्रामीण भागातील राजकीय समीकरणाला गती मिळाली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार अन् कोणाचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. शिवाय, सत्तांतरानंतर काँग्रेसला प्रथमच राजकीय परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यात जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे लक्ष लागले आहे.

शिवाय, दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी नुकतीच राज्य कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहून जतच्या परिस्थितीचा आढावा दिला आहे. शिवाय, येणाऱ्या निवडणुकीत अनेक महत्वाच्या पदावरील बदल करत जतच्या राजकीय पटलावर कोणती रणनीति आखणार?, या रणनीतिला जतचे आमदार कसे दोन हात करणार याची परिणती लवकरच राजकीय आखाड्यात पहायला मिळणार आहे.

शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वंचित गावाच्या पाण्याचा प्रश्न हाताळात नुकतेच जत तालुक्यात पक्षाची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता, तो आता निष्फळ ठरणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय डावपेच खेळणार?, याकडे ही जतकरांचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना पराभूत करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यात परिवर्तनाची मशाल पेटवली. अडीच वर्षाच्या कोरोना महामारीत अभूतपूर्व काम करत आमदारांनी जनतेचे लक्ष वेधले. मात्र, राजकीय दृष्ट्या काँग्रेसच्या वाट्याला अपयशच आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सत्तेत असूनही जत तालुक्याच्या विकासात काँग्रेसला श्रेयापासून दूर खेचण्याचेच प्रयत्न विरोधकांनी केले. मात्र, याला आमदार विक्रमसिंह सावंत अपवाद ठरतात का?, हे पहावे लागणार आहे.

जत पालिकांत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. भाजपच्या काळात जत पालिकेत परिवर्तन घडवून आणत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

यंदा जत शहरात सुरेश शिंदे यांना जतच्या राजकारणात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांची देखील मोठी मदत होणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आगामी निवडणुकीत कंबर कसली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सत्तांतरानंतरची ही निवडणूक कोणाच्या फायद्याची ठरणार, हे येणारा काळ सांगणार आहे.

पक्षीय बलाबल जिल्हा परिषद

भाजप ६

काँग्रेस ३

पंचायत समिती

भाजप ८

काँग्रेस ८

विकास आघाडी १

व जनसुराज्य पक्ष १

नगर परिषद

काँग्रेस नगराध्यक्षांसह ८

राष्ट्रवादी काँग्रेस ६

भाजप ७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com