
-बलराज पवार
सांगली : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांच्यासह महापालिका क्षेत्रातील काँग्रेसचे माजी महापौर, माजी नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत. लवकरच काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद लाड हेही भाजपवासी होण्याची चिन्हे आहेत. एकूणच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झेंडा फडकवायचाच, या दिशेने भाजपची वाटचाल सुरू असल्याचे दिसते.