Chandrakant Patil : घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, चंद्रकांत पाटील यांचे सांगलीत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान

Sangli BJP Leader : भाजपची इशारा सभा चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पाच घोटाळ्यांच्या चौकशीची घोषणा.
Chandrakant Patil

भाजपची इशारा सभा चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर घणाघात

esakal

Updated on
Summary

सभेतील महत्त्वाचे मुद्दे

चंद्रकांत पाटील यांचा इशारा : पाच घोटाळ्यांची चौकशी सुरू केली जाईल, जबाबदाऱ्या भाजप नेत्यांना सोपवण्यात आल्या.

पडळकरांचे वक्तव्य : "महाराष्ट्र म्हणजे फक्त काही घराणी नाहीत, तर सर्व जाती-समाजांचे राज्य आहे. भाजप नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली, तर खपवून घेतले जाणार नाही."

सदाभाऊ खोत : "राष्ट्रवादी ही गुंड, लुटारूंची टोळी आहे. फडणवीसांवर आरोप सहन करणार नाही."

सम्राट महाडिक : "यापुढे भाजप नेत्यांवर दमदाटी सहन होणार नाही."

Jayant Patil Vs Chandrakant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या पाच प्रकरणांची चौकशी करू. जिल्हा बँक घोटाळा, ऑनलाईन लॉटरी घोटाळा, सर्वोदय कारखाना, ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या, वाशी बाजार समितीतील घोटाळ्याची चौकशी झाल्यास त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपच्या इशारा सभेत दिला. भाजपच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, तर याद राखा, खपवून घेतले जाणार नाही, असा खणखणीत इशारा भाजपच्या नेत्यांनी या सभेत दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com