सांगली : राज्य सरकारकडून इंधन करात सवलतीसाठी भाजपची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : राज्य सरकारकडून इंधन करात सवलतीसाठी भाजपची निदर्शने

सांगली : राज्य सरकारकडून इंधन करात सवलतीसाठी भाजपची निदर्शने

सांगली : केंद्र शासनाने इंधन करात सवलत देऊन जनतेला दिलासा दिला आहे. त्या प्रमाणे राज्य शासनाने करात सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजपतर्फे आज निदर्शने करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

केंद्राने पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलिटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलिटर कमी केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने व्हॅटमध्ये कपात करावी, अशी मागणी केली.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, ‘‘काही दिवसांपासून जागतिक बाजार पेठेत पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. त्यास दिलासा देण्याच्या दृष्टीने दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनावरील केंद्र सरकारचे कर कमी केले. जनतेला दिलासा दिला. देशातील एकूण २२ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी करात कपात केली. त्यात भाजपाशासित राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्र राज्याने अद्याप सवलत दिलेली नाही. या भूमिकेचा आम्ही निषेध करतो.’’ आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, गटनेते विनायक सिंहासने, माजी महापौर संगीता खोत, प्रकाश बिरजे, दीपक माने, धीरज सूर्यवंशी, अविनाश मोहिते, बाळासाहेब पाटील, मुन्ना कुरणे, अश्रफ वांकर, अमर पडळकर, नगरसेवक रणजित सावर्डेकर, सुजित राऊत, प्रदेश महिला मोर्चाच्या स्मिता पवार, माधुरी वसगडेकर, ज्योती कांबळे, दिव्या कुलकर्णी आदी सहभागी झाले.

loading image
go to top