सांगलीत गांजा ओढणाऱ्या पाच जणांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
 गांजा
गांजा sakal

सांगली : येथील शामरावनगरमध्ये गिरीजा हॉटेलसमोर मोकळ्या जागेत आणि खिलारे मंगल कार्यालयाजवळ गांजा ओढणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. संशयित जमीर रफीक मुल्ला (वय ३४, विनायकनगर, तिसरी गल्ली, शामरावनगर), इम्रान महंमद मोकाशी (३२, भोसले प्लॉट), उमर हारुण पठाण (२५, पाकिजा मशिदीजवळ), विक्रम श्रीरंग सवणे (८, पाकिजा मशिदीमागे), महंमदशफीक यासीन हाश्‍मी (४०, गादी कारखान्याजवळ, शामरावनगर) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक आज गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार व कर्मचारी सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिस कर्मचारी चेतन महाजन, राहुल जाधव, सुधीर गोरे यांना काही तरुण शामरावनगरमध्ये गिरीजा हॉटेलसमोर गांजा ओढत थांबल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तिकडे धाव घेतली. तेव्हा तिथे जमीर, इम्रान व उमर हे तिघे जण चिलीममधून गांजा ओढत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन चिलीम, गांजाची पुडी जप्त केली.

सहायक निरीक्षक भगवान पालवे व पथकाने खिलारे मंगल कार्यालयाजवळ गांजा ओढणाऱ्या विक्रम व महंमदशफीक या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडूनही चिलीम व गांजा जप्त केला. पाच जणांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात ‘एनडीपीएस’ ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी विनायक सुतार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी गजानन घस्ते, अरुण औताडे, मेघराज रूपनर, सुधीर गोरे, राहुल जाधव, सचिन धोत्रे, वैभव पाटील, चेतन महाजन, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com