
"Citizens’ Action Committee stages Tiradi Morcha in Sangli against unsafe municipal construction."
Sakal
सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी चौकात काल झालेल्या अपघातात शीतल आमरे यांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आज उमटले. सर्वपक्षीय कृती समितीतर्फे राजवाडा येथील सार्वजनिक बांधकामाच्या विभागीय कार्यालयासमोर तिरडी मोर्चा काढण्यात आला. ‘महापालिका व बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेचा हा मृत्यू झाला असून शासकीय विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,’ अशी मागणी करण्यात आली.