सांगलीत पुन्हा गारठली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

सांगली - शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांत पुन्हा थंडी वाढली असून पारा 18 अंशावर आला आहे. गेल्या चोवीस तासांत सांगलीचे तापमाने 2 अंशानी घसरले असून हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे.

सांगली - शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांत पुन्हा थंडी वाढली असून पारा 18 अंशावर आला आहे. गेल्या चोवीस तासांत सांगलीचे तापमाने 2 अंशानी घसरले असून हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच कडाक्‍याची थंडी पडली होती. मध्यंतरी वरदा वादळाने हवामानात बदल झाला होता. तापमान वाढल्याने थोडीफार थंडी कमी झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांत पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडीचे प्रमाण अधिक जाणवत आहे. नागरिक उबदार कपड्यांचा आधार घेत घराबाहेर पडत आहेत. ठिकठिकाणी पेटलेल्या शेकोट्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या चोवीस तासांत तापमान 20 अंशावरून 18 अंशांवर घरसले आहे. कमाल तापमान 32 अंश होते. पुढील आठवड्यात थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: sangli cold climate