सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची रोपवाटिकेस भेट

राजकुमार शहा
बुधवार, 4 जुलै 2018

रोपवाटिकेतील पेरू, सिताफळ यासह अन्य रोपांची त्यांनी पाहणी करून दुष्काळी भागात येणारा कोणता वाण चांगला त्याला लागणारे पाणी लागवड कालावधी एकरी मिळणारे उत्पादन यावर शेतकऱ्याबरोबर सविस्तर चर्चा केली. काळम पाटील यांनी सांगली जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर दिला आहे.

मोहोळ : सांगलीचे जिल्हाधिकारी तथा सोलापूर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी येवती (ता. मोहोळ) येथील गोडसे रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली.

रोपवाटिकेतील पेरू, सिताफळ यासह अन्य रोपांची त्यांनी पाहणी करून दुष्काळी भागात येणारा कोणता वाण चांगला त्याला लागणारे पाणी लागवड कालावधी एकरी मिळणारे उत्पादन यावर शेतकऱ्याबरोबर सविस्तर चर्चा केली. काळम पाटील यांनी सांगली जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर दिला आहे.

उपस्थित शेतकऱ्यांनी रोपवाटिका धारकाकडुन रोपे खरेदी केल्यावर त्याच्या पावत्या मिळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे फळबागा लागवडीबाबत अडचणी येतात काळम पाटील यांनी तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना देऊन फळबाग लागवड योजनेत ज्या अटीमुळे अडचणी येतात त्यावर मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या. जेणे करून फळबागेचे व वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढेल सध्याच्या विज पाणी मजुर या तीन महत्त्वाच्या अडचणींवर सिताफळ किंवा अन्य फळबागा लागवड हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोहोळचे तहसिलदार किशोर बडवे शेतकरी समाधान भोसले, अरूण गोडसे, शरद गोडसे, मधुकर गोडसे, बाळासो पाटील, लक्ष्मण शितोळे आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: sangli collector in Mohol