सांगली : बांधकाम कामगार नोंदीचा बाजार

सवलतीच्या वर्षावामुळे ग्रामीणमध्येही गती
Construction Workers
Construction Workerssakal

सांगली : बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध सवलतींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीचा काही लोकांकडून बाजार मांडण्यात आलेला आहे. लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील काही संघटना, काही हितचिंतकाकडून मलिदा गोळा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आता काही पक्षांनीही उडी घेतली आहे. विविध लाभांमुळे ग्रामीण भागातही नोंदणीने गती घेतली आहे.

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या, निधी आणि नव्याने नोंदणीबाबत विविध कामगार संघटनांकडून आंदोलन सुरू असतात. यातील काही लोक राज्य सरकार किंवा बांधकाम मंडळाकडून काही मिळणार असल्याचा संदेश कामगारांना देत आहेत. त्यांच्या चौकशीसाठी कामगार कार्यालयात अनेकदा गर्दी झाल्याचे चित्र आहे. पार्श्‍वभूमीवर बांधकाम कामगार अधिकाऱ्यांकडून प्रासंगिक खुलासाही केला जातो. बांधकाम कामगारांना संसार सेट मिळण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणताही मागणी अर्ज मागवलेले नाहीत. त्यामुळे यासंदर्भात कामगारांनी कुठल्याही अफवांना व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महिन्यापूर्वी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले होते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांची नोंदणी करून पात्र कामगारांना विविध लाभ देण्यात येत आहेत. त्यात शैक्षणिक साहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक साहाय्य आदी योजनांचा समावेश आहे.

एजंट, मध्यस्थाची नेमणूक नाही

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता इतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता थेट जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नूतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करून घ्यावे, असे आवाहन सहायक कामगार प्रशासनाने केले आहे. मंडळाचे कामकाज राज्यातील सर्व सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत अतिरिक्त स्वरूपाच्या कामकाजान्वये चालविण्यात येते. या कामासाठी खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल व इतर कोणत्याही मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com