esakal | जामिनीसाठी कोर्टाची अफलातून अट; मिरजेतील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

court punish life imprisonment to three people in murder case in yavatmal

जामिनीसाठी कोर्टाची अफलातून अट; मिरजेतील प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : कोरोनाचा संशयित रुग्ण सापडल्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांची तपासणी करण्यास गेलेल्या आशासेविकांवर हल्ला करणाऱ्या मालगाव रस्त्यावरील सुभाषनगरच्या दोन संशयितांचा न्यायालयाने आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकांच्या आदेशान्वये सेवा करण्याच्या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांनी हा आदेश दिला (sangli-covid-center-crime-cases-miraj-covid-19-trending-news-akb84)

याबाबत आधिक माहिती अशी

६ जून २०२१ ला मालगाव रस्त्यावरील सुभाषनगरच्या टाकळी हद्दीत दुर्गामाता कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील संशयितांची तपासणी करण्यासाठी टाकळी आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविका दीपिका स्वप्निल बनसोडे या गेल्या होत्या.यावेळी कुटुंबातील सुमन ऊर्फ सुनीता मधुकर यादव (वय ५५) आणि त्यांचा मुलगा आकाश मधुकर यादव (२४) या दोघांनी आरोग्यसेविका बनसोडे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या सहकारी आरोग्य सेविकेच्या हातातील तपासणी साहित्याचा ट्रे उधळून लाऊन या दोघींसह अन्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्याची धमकी देऊन तेथून हाकलून लावले. या प्रकरणी दीपिका बनसोडे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या अंगावर धावून जाणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या संदर्भात अटक केल्यानंतर पोलिसांनी दोघांचीही जामिनावर मुक्तता करू नये अशी मागणी न्यायालयाकडे केली.

हेही वाचा- ‘टास्क फोर्स’कडील सूचनांच्या अंमलबजावणीतील कमतरता भोवली

दरम्यान या दोघांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अँड.अरविंद देशमुख यांनी सुमन उर्फ सुनिता यादव आणि आकाश यादव या दोघांनाही जामीन मिळू नये अशी विनंती न्यायालयाकडे केली. परंतु, न्यायालयाने या दोघा संशयितांचा जामीन अर्ज मंजूर करताना या दोघा संशयितांनी टाकळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आठवड्यातून दोन दिवस आरोग्य सेविकांच्या आदेशान्वये काम करण्याची आणि या अटीचे पालन झाले नाही तर या दोघांचा जामीन नामंजूर होऊ शकतो अशु अट घातली.अशाप्रकारे संशयितांचा जामीन मंजूर होण्याची सांगली जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

loading image