सांगली : पंधरा दिवसांत १८०० किलोमीटर सायकल प्रवास

संग्राम कचरे व सहकाऱ्यांची आग्रा-राजगड सायकलिंग गरूडझेप मोहीम
 Cycle
Cyclesakal

विटा : घानवड येथील संग्राम सोपान कचरे या युवकाने विटा ते पुणे, आग्रा ते राजगड व परत पुणे ते विटा असा १८०० किलोमीटर सायकल प्रवास १५ दिवसांत पूर्ण केला. सायकलिंग गरूडझेप मोहिमेत त्यांच्यासोबत नीलेश मिसाळ, सोमनाथ शिंदे पुणे यांनी सुद्धा आग्रा ते राजगड १४०० कि. मी. प्रवास पूर्ण केला. गरूडझेप मोहिमेमध्ये आग्ऱ्याहून राजगडापर्यंत शिवस्मरण मार्गावरून शिवज्योत धावत आणली जाते. त्यामध्ये १,२०० युवक सहभागी होते. आपणाला चॅलेंजिंग असे शेवटपर्यंत काय करता येईल तर सायकलिंग करू, असे वाटले.

गरूडझेप मोहिमेचे अध्यक्ष मारुती गोळे, उपाध्यक्ष दिग्विजय जेधे, नीलेश मिसाळ यांचे सहकार्य लाभले.संग्राम कचरे म्हणाले, ‘‘प्रवासादरम्यान अनेक बरे-वाईट अनुभव आले. मदत करणारे लोक पण खूप भेटले. वाईट अनुभवपण आले. धुळे, मालेगावमध्ये असताना माझी सायकल पंक्चर झाली. पंक्चर काढून मी निघालो. सोबती जरा पुढे गेले होते. मला फोन आला ब्लू टूथ कनेक्ट झाले नाही म्हणून हायवेला साईडपट्टीवर सायकल थांबवून बोलू लागलो. मागून बाईकवरून तीन जण आले. हातातील फोन हिसकावून घेऊन गेले. तीन दिवस तर पूर्ण पावसातून सायकल चालवायला लागली.

त्यातला एक दिवस खूप कठीण व परीक्षा पाहणारा होता. आदल्या दिवशी दुपारी जेवण जरा मसालेदार झाले. त्यामुळे पोट बिघडले. पोटात दुखत होते. पाऊस होता. तोंडावरच वारे पण होते. १४० किलोमीटर अंतर पूर्ण करायचे होते. मनात जिद्द होती. काहीही झाले तरी कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून पुढे जात राहायचे. खंबीर मानसिकतेनेच मार्ग निघत गेले.

बऱ्याच वेळा सायकल पंक्चर झाली. सगळे पंक्चर किट सोबत असायचे. त्यामुळे घोटाळा झाला नाही. खूप वेगळे अनुभव होते. एवढ्या मोठ्या प्रवासादरम्यान खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आग्ऱ्यावरून सुटका हा ऐतिहासिक प्रसंग लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्देश काही प्रमाणात तरी सफल झाल्याचे समाधान वाटते. तरुणांनी आव्हानात्मक व धाडसी काम केले पाहिजे, असे आवाहन संग्राम यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com