सांगली : ‘दामिनी’ शेतकऱ्यांना वरदान !

वीज पडण्यापूर्वी १५ मिनिटे आधी अॅप देते माहिती : हानी टाळणे शक्य
 Damini mobile app
Damini mobile appsakal

सांगली : दरवर्षी मॉन्सून व मॉन्सूनपूर्व काळात आकाशात विजेचा गडगडाट होऊन विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन अनेक शेतकरी, सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवित हानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. हे ॲप वीज पडण्याची पूर्वसूचना देते. शेतकरी, नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी ॲपचा अवश्य वापर करावा.

ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वीज पडण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर हे वीज पडण्याचे संकेत; तसेच विजांच्या कडकडाटाबरोबरच त्याचा वेग किती आहे, हे सुद्धा ॲपवर कळते. या ॲपच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तविला जात असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे सावध राहून जीवित व वित्तहानी वेळीच टाळता येते.

‘दामिनी’ ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना; तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गावस्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना ‘दामिनी’ ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे. तसेच ॲपचे ‘जीपीएस’ लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा १५ मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. त्यावेळी झाडांचा आश्रय घेऊ नये. ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, गुराखी, मेंढपाळ यांनी ‘दामिनी’ ॲप डाऊनलोड करुन घ्यावे.

जून, जुलैत ॲप अवश्य वापरावे...

मॉन्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवितहानी होते. जीवितहानी होऊ नये, यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ‘दामिनी’ ॲप अवश्य वापरावे. ‘दामिनी’ ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com