esakal | सांगलीतील दंडोबाच्या डोंगरावर वाघ, सिंह, चित्ता? हो, हे होऊ शकतं!
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीतील दंडोबाच्या डोंगरावर वाघ, सिंह, चित्ता? हो, हे होऊ शकतं!

देशातील प्रख्यात उद्योग संस्थांकडे तसा प्रस्ताव दिला, तर त्या नक्कीच असा प्रकल्प उभा करू शकतील

सांगलीतील दंडोबाच्या डोंगरावर वाघ, सिंह, चित्ता? हो, हे होऊ शकतं!

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी येथे प्राणी संग्रहालयासारखा मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. सांगली, मिरज शहरापासून जवळच दंडोबा डोंगरावर त्यासाठी संधी आहेत. देशातील प्रख्यात उद्योग संस्थांकडे तसा प्रस्ताव दिला, तर त्या नक्कीच असा प्रकल्प उभा करू शकतील, असा विश्‍वास ‘झू डेव्हलपमेंट’चे अभ्यासक सुनील पाटील यांनी व्यक्त केला.

येथील सांगली व्हिजन ॲट ७५ फोरमतर्फे आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. पाटील सध्या गुजरात राज्यातील एका भव्य प्राणी संग्रहालय प्रकल्पावर काम करत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने सांगलीतील संधीवर आपला दृष्टीकोन मांडला. फोरमचे संयोजक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, राज्य शासनाचे मानद वन्यजीव रक्षक अजित उर्फ पापा पाटील प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: "चोराच्या उलट्या बोंबा"; नाना पटोलेंचा फडणवीसांवर निशाणा

सुनील पाटील म्हणाले, ‘‘देशातील मोठ्या उद्योग संस्था देशातील पर्यटन विकास आणि पर्यावरण विकासासाठी काम करण्यास उत्सुक आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातून पाठपुरावा झाला आणि योग्य जागा उपलब्ध करून दिली, तर संधी नक्कीच आहे. दंडोबा हे पर्यटन विकासासाठीचे आदर्श ठिकाण ठरेल. कारण ते आता राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. ते जिल्ह्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे. सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प होऊ शकतो. चांदोली हे तर सर्वोत्तम ठिकाण आहे. तेथे पर्यटनास अन्य संधी आहेत. त्यावर काम व्हावे.’’

अजित पाटील म्हणाले, ‘‘निसर्ग संवर्धन, प्राणी संवर्धन आणि पर्यटन विकास या गोष्टी एकत्र पुढे नेताना आव्हाने खूप आहेत. ती पेलून पुढे जावे लागेल. ’सुरेश पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक विकासाचा नेमका अजेंडा घेऊन फोरम काम करत आहे. त्यात पर्यटन हा उद्योग विकासाइतकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करू. चांदोली जंगल, सागरेश्‍वर अभयारण्य, दंडोबा डोंगर ही आपली ताकद आहे. तेथे विकासासाठी सुनील पाटील यांच्यासारख्या अभ्यासू लोकांचा मदत घेऊ.’’

हेही वाचा: Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

loading image
go to top