Sangli Bank Election : सोसायटी गटात महाआघाडीचा षटकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli-bank

सोसायटी गटातील सात जागांमध्ये महाआघाडीने 6-1 ने बाजी मारली.

Sangli Bank Election : सोसायटी गटात महाआघाडीचा षटकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात महाआघाडीचे उमेदवार व काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजपच्या पॅनेलमधून लढणारे प्रकाश जमदाडे विजयी झाले. (DCC Bank Election) सोसायटी गटातील सात जागांमध्ये महाआघाडीने 6-1 ने बाजी मारली. मिरजेतील शेतकरी भवनमध्ये आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे 52-16 विरुध्द मतांनी विजयी. भाजप पॅनेलचे उमेश पाटील पराभूत झाले. (Sangli District Bank Election)

हेही वाचा: विधान परिषदेत सतेज पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम’ करणार

जत सोसायटी गटात काॅंग्रेसला धक्का बसला. विद्यमान संचालक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत पराभूत झाले. भाजपचे प्रकाश जमदाडे 45-40 मतांनी विजयी झाले. आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील 40-29 मतांनी विजयी झाले. भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख पराभूत झाले. कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे 54-14 मतांनी विजयी झाले. भाजपचे विठ्ठल पाटील पराभूत झाले.

तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी एस पाटील विजयी 41-23 मतांनी विजयी झाले. भाजपचे सुनिल जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील पराभूत झाले. पाटील यांना 15 मते पडली. वाळवा सोसायटी गटात विद्यमान अध्यक्ष महाआघाडीचे दिलीप पाटील 108-23 मतांनी विजयी झाले. भाजपचे भानुदास मोटे पराभूत झाले. कडेगाव सोसायटी गटात महाआघाडीचे आमदार मोहनराव कदम 53-11 मतानी विजयी झाले. भाजपचे तुकाराम शिंदे पराभूत झाले.

हेही वाचा: करेक्ट कार्यक्रम; जिल्हा बॅंकेत भाजपच्या माजी आमदाराला पराभवाचा धक्का

loading image
go to top