
सांगली जिल्हा बँकेकडून नोकर भरती, ५०७ पदांसाठी जागा
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
५०७ पदांची भरती प्रक्रिया मंजूर: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५०७ पदांसाठी नोकरभरतीस शासनाची परवानगी; यात ४४४ लिपिक आणि ६३ शिपायांची पदे आहेत.
पारदर्शक भरतीची हमी: शासनमान्य कंपनीमार्फत कोणत्याही राजकीय किंवा एजंट हस्तक्षेपाशिवाय भरती प्रक्रिया होणार असल्याची खात्री अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.
भूमिपुत्रांना प्राधान्य: भरतीत सांगली जिल्ह्यातील पात्र युवकांनाच संधी मिळणार; तर ४०० विद्यमान कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रिया सुरु आहे.
Sangli District Bank Recruitment 2025 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत नोकरभरती करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यात ५०७ पदे भरण्यात येणार असून, त्यातील ४४४ लिपिक व ६३ शिपायांची पदे आहेत. शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीकडूनच कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, पारदर्शीपणे भरती प्रक्रिया होईल. जिल्ह्यातील भूमि पुत्रांना मोठी संधी असल्याचे बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज येथे सांगितले.