
Sangli District Bank
esakal
थोडक्यात मुद्दे
दिलीप पाटील यांच्यावर टीका, जिल्हा बँकेतील alleged घोटाळ्याची चौकशी होणारच, आमदार जयंत पाटील यांच्यावर लॉटरी घोटाळ्याचा आरोप.
ठाण्यातील बिल्डर आत्महत्येच्या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा.
वाशी मार्केटमधील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी. ‘सर्वोदय’ साखर कारखाना परत घेण्याचा निर्धार.
Sangli Politics : महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत हातवारे करून केलेल्या विधानांचा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. आता जिल्हा बँकेतील नोकर भरती घोटाळ्याची चौकशी होणारच, त्यासाठी भले मला उपोषणाला बसावे लागले तरी चालेल, असे सांगून त्यांनी आता दिलीप पाटलांची घेराबंदी केली जाईल, असा इशारा दिला.