Sangli District Bank chairman election November 18
esakal
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्याविरोधातील उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडील सुनावणी २६ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १८) होणाऱ्या अध्यक्ष निवड कार्यक्रमात लाड यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता बळावली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जोरदार हालचाली सुरू (Sangli Political News Today) आहेत.