Sangli district bank election voting percentage
esakal
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात विक्रमी ९३.९१ टक्के मतदान झाले. एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क (Sangli DCC Bank election latest news) बजावला. जत, कवठेमंकाळ, तासगाव, मिरज सोसायटी गटात शंभर टक्के मतदान झाले. सहा जागांसाठी रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी (ता. ३) मतमोजणी होईल. आघाडीसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.