
-अतुल पाटील
सांगली : पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या ई-व्हेईकलकडे ग्राहकांचा कल आहे. मात्र खरेदीचा टक्का कासवगतीनेच वाढत आहे. जिल्ह्यात ई-व्हेईकलच्या नोंदणीला ११ वर्षांपूर्वी सुरवात झाली. तेव्हापासून एकूण वाहनांच्या तुलनेत ई-व्हेईकलचा वाटा सरासरी ३ टक्के इतका आहे. सन २०२४ या एका वर्षाची आकडेवारी काढली तर, हाच टक्का सहा टक्क्यांवर पोहोचला आहे.