

Drunk Skoda Driver Crashes into Multiple Vehicles in Sangli
Esakal
सांगली : शहरातील कल्पतरू मंगलकार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. एक मद्यधूंद कार चालक चुकीच्या दिशेने कार चालवत आला. त्याने समोरून येणाऱ्या चार ते पाच वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मद्यधुंद चालकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.