

Sangli District Loan Waiver 37865 Farmers Eligible First Phase Includes 34000 District Cooperative Bank Beneficiaries
sakal
सांगली : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज प्रसिद्ध झाली. यादीत जिल्ह्यातील ३७ हजार ८६५ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३४ हजार आणि राष्ट्रीयकृत बँकांतील ३ हजार ८६५ शेतकरी पात्र ठरले आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक ११ हजार ५१८ शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत. शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी; तर नियमित कर्जदारांना ५० प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.