

Sangli Farmer Loan Waiver Scheme 2026 Second List Announced 4099 Farmers to Receive Debt Relief After Aadhaar Verification
sakal
सांगली: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील ४ हजार ९९ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुनील चव्हाण यांनी दिली. आतापर्यंत ३१ हजार ९४ शेतकऱ्यांना २२३.८ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.