Sangli Farmer : कांडी मागे पडली! सांगलीत ऊस रोपांची लागवड जोमात, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे बळ
Sugarcane Seedling Plantation : कमी उगवण क्षमता, जास्त मजुरी आणि जास्त कालावधी यामुळे पारंपरिक कांडी लागवड मागे पडत असून रोपांची लागवड शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात सुरू हंगामातील ऊस लागवडीस आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. लागणीसाठी शेतकरी ऊसरोपांना अधिक पसंती देतानाचे चित्र आहे. ऊस लागवडीसाठी पारंपरिक कांड्यांचा वापर कमी होतो आहे.