'डरनेका नही डट के रहनेका'

बलराज पवार
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

महापुराच्या वेढ्यात हजारोजण अडकले आहेत. प्रत्येकाला मदतीची गरज आहे. हजारो हात मदत करत आहेत. आपल्याला प्रशासनाने बोटीतून बाहेर काढावे आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र प्रशासन सगळ्यांपर्यंत पोहोचेल असे नाही त्यामुळे एकमेकाला धीर देत, आहे त्या परिस्थितीत धीराने राहण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून केले जात आहे. असेच एक पूरग्रस्त अविनाश जाधव यांनी 'डटके रहने का डरनेका नही' असे आवाहन केले आहे.

सांगली - महापुराच्या वेढ्यात हजारोजण अडकले आहेत. प्रत्येकाला मदतीची गरज आहे. हजारो हात मदत करत आहेत. आपल्याला प्रशासनाने बोटीतून बाहेर काढावे आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र प्रशासन सगळ्यांपर्यंत पोहोचेल असे नाही त्यामुळे एकमेकाला धीर देत, आहे त्या परिस्थितीत धीराने राहण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून केले जात आहे. असेच एक पूरग्रस्त अविनाश जाधव यांनी 'डटके रहने का डरनेका नही' असे आवाहन केले आहे.

सांगलीत विविध भागात मोठ्या संख्येने कुटुंबे पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. वीज वितरण मंडळाने काही भागात विद्युत पुरवठाही बंद केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात त्यातही पाण्याचा वेढ्यात कुठल्याही मदतीशिवाय अडकलेल्या पूरग्रस्तांच्या अवस्था बिकट झाली आहे. सोशल मीडिया वरून आपण कुठे आहोत कुठल्या परिस्थितीत आहोत याची माहिती ते देण्याचा प्रयत्न करत आहेत.

महापालिका प्रशासन, एनडीआरएफ, लष्कर, हजारो स्वयंसेवक पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सगळ्यांनाच घरातून बाहेर काढणे प्रशासनाला शक्य होत नाही. त्यामुळे पूरग्रस्त नाराज आहेत. प्रशासन हतबल आहे याची जाणीव न ठेवता त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र अशा परिस्थितीत अविनाश जाधव यांनी सोशल मीडिया वरून 'डटके रहने का डरनेका नही' असे आवाहन करून पूरग्रस्तांना आलेल्या परिस्थितीला तोंड देत धीराने राहण्याचे आवाहन केले आहे.

जाधव यांनी टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, आम्ही सर्व कुटुंब रात्रीच्या वेळी देखील निसर्गाच्या सान्निध्यात आहोत.  सगळीकडे अंधारच अंधार आहे. फक्त समई , निरंजन, पणत्या, आणी मेणबत्ती यांचाच आधार आहे. 

मी सगळ्या पुरामध्ये अडकलेल्या बांधवांना विनंती करतो की पॅनिक होवू नका पूर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ओसरणार आहे. शासन,  सर्व अधिकारी,  सर्व पक्ष, सर्व कार्यकर्ते, सर्व स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.  मी स्वतः एक पूरग्रस्त आहे. पुरात अडकून आहे. म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की धिर धरा पूर निसर्गाच्या कृपेने लवकरच ओसरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Water Family Avinash Jadhav