सांगलीतील महापुरात अडकलेल्या मलेशियाच्या 7 जणांना वाचविले

बलराज पवार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सांगलीतील डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटल येथे उच्च शिक्षणासाठी मलेशियातील सात प्रशिक्षणार्थी आले आहेत. हे सर्वजण माधव नगर रोड वरील सर्किट हाऊस जवळ असलेल्या हॉटेल न्यू प्राईड येथे उतरले आहेत. ज्या हॉटेलमध्ये हे उतरले आहेत तो संपूर्ण परिसर पुराच्या वेढ्यात अडकला आहे, आपण पुराच्या वेढ्यात आहोत हे लक्षात आल्यावर तेही गांगरून गेले होते. त्यांनी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि आपण पुराच्या वेढ्यात असल्याची माहिती दिली.

सांगली - शहरातील नंदादीप आय हॉस्पिटल येथे प्रशिक्षणासाठी आलेले मलेशियातील सातजण महापुरात अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

सांगलीतील डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटल येथे उच्च शिक्षणासाठी मलेशियातील सात प्रशिक्षणार्थी आले आहेत. हे सर्वजण माधव नगर रोड वरील सर्किट हाऊस जवळ असलेल्या हॉटेल न्यू प्राईड येथे उतरले आहेत. ज्या हॉटेलमध्ये हे उतरले आहेत तो संपूर्ण परिसर पुराच्या वेढ्यात अडकला आहे, आपण पुराच्या वेढ्यात आहोत हे लक्षात आल्यावर तेही गांगरून गेले होते. त्यांनी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक विठ्ठल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि आपण पुराच्या वेढ्यात असल्याची माहिती दिली. श्री. चव्हाण यांनी तातडीने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मलेशियाचे सातजण न्यू प्राईड हॉटेलमध्ये अडकल्याची माहिती दिली, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख सर्जेराव देसाई यांनी पथकासह बचाव कार्यासाठी असलेली बोट घेऊन न्यू प्राईड येथे धाव घेतली आणि पुरात अडकलेल्या मलेशियाच्या सात नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

नंदादीप आय हॉस्पिटल येथे डोळ्यांवरील आधुनिक उपचारांच्या प्रशिक्षणासाठी मलेशियातील हे सातजण आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Water Malaysian Pkeople Life Saving Fire Brigade Jawan