सांगलीत महापुराने 2005 चा रेकॉर्ड मोडला; पाणी पातळी 54.2 फूट

बलराज पवार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सन 2005 चा सर्वोच्च पातळी चा रेकॉर्ड मोडला. आयर्विन पुलाजवळ आज सकाळी 54 फूट पाणी पातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरा वेळी 53 फूट नऊ इंच इतकी पाणी पातळी होती, या महापुराने निम्मे शहर पाण्यापासून जिल्ह्यातील 75000 हून अधिक नागरिक बाधित झाले आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

सांगली - सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सन 2005 चा सर्वोच्च पातळी चा रेकॉर्ड मोडला. आयर्विन पुलाजवळ आज सकाळी 54 फूट पाणी पातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरा वेळी 53 फूट नऊ इंच इतकी पाणी पातळी होती, या महापुराने निम्मे शहर पाण्यापासून जिल्ह्यातील 75000 हून अधिक नागरिक बाधित झाले आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

एनडीआरएफच्या दोन टीम पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत,
सांगलीत महापुराने शहराला वेढा घातला आहे. रात्रभर पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरणातून सोडलेल्या एक लाख 21 हजार क्युसेक इतक्या पाण्याने कृष्णाच्या पाणीपातळी मध्ये मात्र वाढ होत आहे, त्यामुळे सर्वात वेगाने पाणी पसरत आहे, रात्री दोन वाजता पाणी पातळी 53 फूट होती ते सकाळी आठ वाजता 54 फूट  झाली.

सन 2005 मध्ये आलेल्या महापुरावेळी आयर्विन पुलाजवळ ५३.९ फूट इतकी पाणी पातळी होती, आज सकाळी महापुराचा हा रेकॉर्ड मोडला गेला. 
शहरातील सराफ कट्टा, मेन रोड, हरभट रोड, एसटी स्टँड, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, शामराव नगर, गावभाग, टिळक स्मारक, मल्टिप्लेक्स या सर्व ठिकाणी पाणी पसरले आहे. शहरातील सुमारे दहा हजार नागरिक या पुराने बाधित झाले आहेत, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने आणखी किती पातळी होणार या भीतीने नागरिक ग्रस्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Water Rain Record Break